Supriya Sule on Sunil Tingre At , Vadgaon Sheri Assembly constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने वडगाव शेरी या मतदारसंघातून बापू पठारे यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी मतदारसंघात पठारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली त्या सभेत सुप्रिया सुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी या सभेत सांगितलं की “येथील आमदाराने (सुनील टिंगरे) शरद पवारांना (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष) नोटीस पाठवली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात माझी बदनामी कराल तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. असं त्या नोटिशीत लिहिलं होतं”.

सुप्रिया सुळे सभेला उपस्थित असलेल्या लोकांना म्हणाल्या, “तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ८० वर्षाच्या योद्ध्याबद्दल ते (सुनील टिंगरे) आपल्या भाषणात (यापूर्वीच्या निवडणुकीत) बोलत होते. ज्यांनी तुमच्या एबी फॉर्मवर सही केली होती, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलात, त्याच शरद पवारांना तुम्ही पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर नोटीस पाठवली होती. ‘माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन’ असं त्या व्यक्तीने (सुनील टिंगरे) शरद पवारांना नोटीसीद्वारे बजावलं होतं. तशी नोटीस त्यांनी पाठवली होती. तुम्ही माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन असं त्यात त्यांनी म्हटलं होतं”.

Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे सुनील टिंगरे यांना आव्हान देत म्हणाल्या, मी एकदा नाही, पुन्हा पुन्हा आणि शंभर वेळा तुम्हाला आव्हान देते, तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा, मी त्या पोर्शे कार अपघात प्रकरणात हत्या झालेल्या मुलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही ती कृती करणाऱ्या (अपघातातील आरोपी) व्यक्तीच्या पाठीशी उभे होतात, हे सर्वांना माहीत आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे (शिवसेना उबाठा उपनेत्या) आणि आमदार रवींद्र धंगेकर (काँग्रेस नेते) यांना नोटीस पाठवून दाखवा. आम्ही लढू, कारण आम्हाला कोणाची भीती नाही.

हे ही वाचा >> Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

महायुती सरकारला आव्हान

‘ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,’ असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी शुक्रवारी पुण्यात याबाबत भाष्य करताना, महायुती सरकारचे वाभाडे काढले. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले. “आमच्या घरातील महिलांवर का आरोप करता? माझ्या तीन बहिणींवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकायचे कारण काय? तुमची लढाई राजकीय आहे, तर आमच्याशी लढा”, असे थेट आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिले.

Story img Loader