पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे ‘गृहमंत्री जवाब दो’ या राज्यात काय चाललंय. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत यावेळी त्यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकर यांचे स्वागतच : सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला भागात वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा होत आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वांच्या सभा सर्व ठिकाणी झाल्या पाहिजेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये गैर काय आहे. आपल्या संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिला असून आम्ही काही दडपशाहीवाले नाहीत. कोणी कुठेही जायचे, धमक्या द्यायचे ही आमची परिस्थिती नाही. सर्वांनी सर्वांच्या मतदारसंघात जावे, देशाच्या सेवेसाठी लढावे. मी त्यांचे स्वागतच करते, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

हेही वाचा – पुणे: येरवड्यात कोयता गॅंगची दहशत, तरुणावर वार; चार अल्पवयीन मुले ताब्यात

त्यांना ‘सौ’ खून माफ असतात : सुप्रिया सुळे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या इच्छुक उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यावर मला काहीही आश्चर्य वाटत नाही. नियमावर केंद्र आणि राज्य सरकार चालतच नाही. विरोधकांसाठी नियम आणि कायदे आहेत. त्यामुळे त्यांना ‘सौ खून माफ’ असतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा – पुणे : चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन

केंद्र सरकारला 2024 च्या निवडणुकीअगोदर शेवटची संधी : सुप्रिया सुळे

केंद्राचे बजेट सादर केल जाणार आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महागाई आणि बेरोजगारीवर ठोस पावले उचलली पाहिजे. या सरकारचे हे शेवटचे मोठ बजेट आहे. केंद्र सरकारला 2024 च्या निवडणुकीअगोदर शेवटची संधी आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule for agitation in pune comment on crime in pune and criticize devendra fadnavis svk 88 ssb
First published on: 30-01-2023 at 12:40 IST