पुणे : महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीची लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी झाली. यामध्ये शरद पवारांच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला.

लोकसभेला मिळालेल्या यशामुळे विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मधून शरद पवार कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात ते आठ वेळा निवडणूक लढवून विजयी झाल्याने आता इच्छा राहिली नाही, असे वक्तव्य करत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे बारामतीतून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा..आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे – स्वप्नील कुसाळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या मतदार संघातून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. भावी आमदार म्हणून त्यांचे फ्लेक्स या मतदार संघात लागले आहेत. त्यातच आता बारामती लोकसभेच्या खासदार आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. बारामती मधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का असा प्रश्न खासदार सुळे यांना विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना सुळे म्हणाल्या, विधानसभेसाठी अद्याप जागा निश्चित झालेल्या नाहीत. या बाबत लोकांच्या भावना विचारात घेत निर्णय घेतला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे. कुटुंबातील नागरिकांना हार्दिक अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळावी यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीचा विविध भागात दौरे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा…शहरबात : वार्ता उत्सवाची…

महाराष्ट्राचा कारभार दिल्लीतून

राज्यात महिलांवर होणारे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महिला अत्याचाराबाबत हे सरकार असंवेदनशील आहे. राज्यात विविध भागात महिलांवर अत्याचाराचा प्रकार घडत असताना राज्याचे गृहमंत्री बहुतांश वेळा दिल्लीतच असतात. महाराष्ट्राचा कारभार हा दिल्लीतूनच चालविला जात असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.