पुणे : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या पुणे विभागीय केंद्र अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. त्यात अपंग असलेला प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी सूरज मुजावर पायाने लिहून परीक्षा देत आहे. मुक्‍त विद्यापीठाच्‍या पुणे विभागीय केंद्राअंतर्गत सूरजने कला शाखेत प्रथम वर्षात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पाणीव येथील श्रीराम शिक्षण महाविद्यालय या अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतला आहे.

दुष्काळी भागातील आर्थिक दुर्बल पार्श्वभूमी असलेला सूरज जन्मतः अपंग आहे. मात्र उच्च शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो मुक्त विद्यापीठाद्वारे शिकत आहे. अपंगत्वामुळे सूरजला परीक्षेसाठी वाढीव वेळ, स्‍वतंत्र लेखनिक, वेगळा परीक्षा वर्ग देणे या सवलती देण्याची विद्यापीठाची तयारी असूनही तो सर्वसामान्य मुलांबरोबर स्वतः पायाने लेखन करून परीक्षा देत आहे. परीक्षेच्या कालावधीत सूरजला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्‍लागार डॉ. व्‍ही. बी. गायकवाड यांनी दिली.

Maharashtra University of Health Sciences, medical exam of Summer Session 2024, 22 June medical exam of Summer Session 2024, 82000 Students to Participate medical exam 2024 summer,
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २२ जूनपासून, आरोग्य विद्यापीठामार्फत घेण्यात येणार परीक्षा
Mumbai university marathi news
आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रसार, मुंबई विद्यापीठातर्फे विशेष कार्यशाळा
Mumbai university Online Enrollment
महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नावनोंदणीही बंधनकारक, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आवाहन
NEET exam, Increased NEET Scores, Increased NEET Scores Intensify Competition, Increased NEET Scores Intensify Competition for Government Medical College, medical admission, neet exam, increase neet score, National Eligibility cum Entrance Test,
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश यंदा आव्हानात्मक… झाले काय?
Mumbai university ba result marathi news
मुंबई: ‘बी.ए.’च्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ४९.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, ५०.६९ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण
Nagpur university
नागपूर विद्यापीठात वाद : परीक्षेत ‘आरएसएस’ संस्थापक डॉ. हेडगेवारांवर प्रश्न, विद्यार्थी म्हणतात, ‘जाणीवपूर्वक…’
yavatmal ssc board class 10 th result
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: यवतमाळमध्ये दहावीतही मुलींचीच बाजी; विभागात चौथ्या स्थानावर, निकाल ९४.५७ टक्के
12th student
१२वीचा निकाल ९३.३७ टक्के; कोकण पुन्हा अव्वल, मुंबई सर्वांत मागे,सव्वातेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण

हेही वाचा…Pune Porsche Crash : रक्ततपासणीवेळी डॉक्टर आणि आरोपीच्या वडिलांमध्ये १४ वेळा संभाषण

मुक्‍त विद्यापीठामुळे माझी उच्‍च शिक्षण पूर्ण करण्याची स्‍वप्‍न साकार होत आहे. याचा मनस्‍वी आनंद आहे. विद्यापीठाकडून सर्व सहकार्य मिळत आहे, असल्याची भावना सूरजने व्यक्त केली.

हेही वाचा…मावळ : पनवेल, चिंचवडचा कल निर्णायक?

अपंगत्व असलेला सूरज मुजावर हा विद्यार्थी कोणाचीही मदत न घेता पायाने लेखन करून परीक्षा देत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याची विद्यापीठाची भूमिका आहे.– डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ