Surekha Punekar criticizes Governor Bhagat Singh Koshyari over controversial statement made about Chhatrapati Shivaji Maharaj | Loksatta

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा’; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मागणी

पुणेकर म्हणाल्या, भाजपामध्ये महिलांबद्दल कोणत्याही प्रकाराचा सन्मान राखला जात नाही हे अनेक उदाहरणामधून स्पष्ट होत आहे.

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा’; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मागणी
सुरेखा पुणेकरांची राज्यपालांवर टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षासह अनेक संघटनांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. राजकीयबरोबर आता मनोरंजन क्षेत्रातूनही राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे. राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांनी आपल्या आराध्य दैवताबाबत केलेलं विधान अत्यंत चूकीचं आहे. त्यामुळे त्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवा’, अशी मागणी सुरेखा पुणेकरांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

हेही वाचा- वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण

भाजपामध्ये महिलांबद्दल कोणत्याही प्रकाराचा सन्मान राखला जात नाही हे अनेक उदाहरणामधून स्पष्ट होत आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाब केलेल्या वादग्रस्त विधानानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, अशा प्रकारचे विधान भाजपाबाह्य व्यक्तीने केलं असत तर त्याच्यामागे चौकशीचा फेरा लावला असता, असं म्हणत पुणेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल

दुबईत लावणी महोत्सवाच आयोजन

महाराष्ट्राची लोककला म्हणून लावणीची एक ओळख आहे. १० ते १३ डिसेंबर २०२२ दरम्यान दुबई येथे तीन दिवसीय लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात सुरेखा पुणेकर आपली कला सादर करणार आहेत. आजपर्यंत राज्याच्या अनेक भागात लावणी सादर केली आहे. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. तर लावणीच कौतुकही केलं आहे. आता ईन्स्पायर इव्हेंट्स ग्रुपच्यावतीने दुबई येथे लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला. याबद्दल मला विशेष आनंद असून तेथील रसिक प्रेक्षकांना आपली कला दाखविण्याची संधी मिळणार आहे. तसेच या महोत्सवानंतर लावणीबाबत तरुणींना प्रशिक्षण देखील देणार असल्याचे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:55 IST
Next Story
मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”