scorecardresearch

…अन् लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर झाले!

नर्तीका सोनाली जळगावकर यांनी ‘कस गाऊ मी तुमचे गुण, तुमचे माझ्यावर रून’, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, तुमच्या पायात हवा’.. ही लावणी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी सादर केली. लावणी पाहताना पुणेकर यांना अश्रू अनावर झाले.

lavani festival Chinchwad
…अन् लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर झाले! (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पिंपरी : चिंचवड येथील राज्यस्तरीय लावणी महोत्वसात मी राजसा तुम्हासाठी ग्रुपच्या नर्तीका सोनाली जळगावकर यांनी ‘कस गाऊ मी तुमचे गुण, तुमचे माझ्यावर रून’, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, तुमच्या पायात हवा’.. ही लावणी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी सादर केली. लावणी पाहताना पुणेकर यांना अश्रू अनावर झाले.

पुणेकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे दोघींनीही रंगमंचावर जात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मी लावणीसाठी घरदार सोडून उभे आयुष्य दिले. कलाकारांकडून दाखला मिळाला. त्यामुळे माझा स्वाभिमान वाढला. माझ्या डोळ्यातून आनंदअश्रू आल्याचे पुणेकर म्हणाल्या.
पुणेकर यांनी नर्तिका सोनाली जळगावकर यांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. सध्या लावणीबाबत जे काही चालले आहे त्यावर प्रेक्षकांनी पडदा टाकावा. शासनाने लावणी, सवाल-जवाबचे महोत्सव जिल्हानिहाय भरविले पाहिजेत. ही कला मागे पडत चालली असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – पुणे : नदी पात्रातील झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्याने झाडावर बसून केला विरोध

हेही वाचा – पुणे : देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे; अटीतटीच्या लढतीत उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव

लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी, पारंपरिक लावणी जपण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय लावणी महोत्सवाचा रविवारी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या