scorecardresearch

Premium

सुषमा अंधारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका: म्हणाल्या, “नवाब मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे…”

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी महाविकास आघाडीकडे मागणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला नाही, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला.

Sushma Andhare criticizes Devendra Fadnavis
सुषमा अंधारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका: म्हणाल्या, "नवाब मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे…" (संग्रहित छायाचित्र)

पुणे : नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी महाविकास आघाडीकडे मागणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला नाही. मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे फडणवीस यांची भूमिका बदलली का, अशी विचारणा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे शुक्रवारी केली.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आले होते. त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. त्यानंतर सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मलिक नकोत, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दिले. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांना उशिरा विवेकवाद कसा आठवला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Narayan Rane Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर राणे-भुजबळांचा आक्षेप, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारने घेतलेला निर्णय…”
Vijay Wadettiwar
“छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ…”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ कृतीवरून मुख्यमंत्र्यांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Bihar Chief Minister Nitish Kumar criticizes PM Narendra Modi to take full credit for Karpuri Thakur Bharat Ratna Award
संपूर्ण श्रेय पंतप्रधानांनीच घ्यावे; नितीश

हेही वाचा – बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

अजित पवार आणि नवाब मलिक यांच्यामध्ये दोन ते तीन भेटी झाल्या होत्या. मात्र मलिक यांचा विषय काढण्यामागील राजकारण वेगळे आहे. अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मात्र मलिक प्रकरणावर पुढील तीन ते चार दिवस चर्चा होईल. सत्तेपेक्षा देश मोठा, हा विवेकवाद फडणवीस यांना उशिरा सुचला आहे. भावना गवळी, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रिफ यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. तरीही ते सत्तेत महत्त्वाच्या पदावर आहेत. मनोज कंबोजसारखी व्यक्ती पुढे केली जाते. त्यावेळी फडणवीस यांचा विवेकवाद कुठे जातो, अशी टीका अंधारे यांनी केली.

हेही वाचा – भंडारा : अवकाळीग्रस्तांच्या भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार… राज्यपालांची ग्वाही

ससूनमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरणी काहींना अटक झाली आहे. कारागृहातून या अवैध कृतीला बळ दिले जात होते. त्यामुळे कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sushma andhare criticizes deputy cm devendra fadnavis what she said about nawab malik pune print news apk 13 ssb

First published on: 08-12-2023 at 17:55 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×