पुणे : विवाहाचे आमिषाने डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सांगलीतील एका डॉक्टरला बिबवेवाडी पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केली. आरोपी डॉक्टरने तरुणीकडून दहा लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली होती.

याप्रकरणी डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३० रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याला अटक करण्यात आली. त्याला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत डाॅक्टर तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी सावंत याने एका विवाहविषयक संकेतस्तळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळावर बिबवेवाडीतील डाॅक्टर तरुणीची आरोपी सावंत याच्याशी ओळख झाली. सावंत विवाहित होता. ही बाब त्याने डाॅक्टर तरुणीपासून लपविली होती. त्यानंतर त्याने डाॅक्टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

Saif Ali Khan Attack: Mumbai Police Conducts Identification Parade for Suspect Shariful Islam in Arthur Road Jail
सैफ हल्ला प्रकरणः नर्स लीमा आणि आया जुनू यांनी ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mumbai health department loksatta news
वैद्यकीय अधिकारी २४ वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत, अनेकजण पदोन्नतीशिवायच निवृत्त
Image of RG Kar Medical College & Hospital, where a tragic incident occurred involving an MBBS student.
कोलकाता पुन्हा हादरले, आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS ची विद्यार्थीनी आढळली मृतावस्थेत
Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
accused Valmik Karad treated by health department as per their medical needs no extra facilities provided
वाल्मीक कराडसह कोणत्याही आरोपीला अतिरिक्त आरोग्य सुविधा नाहीत
construction worker in Susgaon beaten for inquiring about ongoing digging with Poklen
बांधकाम व्यावसायिकाला मारहाण; माजी नगरसेवकासह दोघांविरोधात गुन्हा
6 arrested for 40 lakh medical college admission scam
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा

तरुणीने त्याला जाब विचाराला. तेव्हा त्याने विवाहित असल्याचे तिला सांगितले. या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसला. त्यानंतर ७ जानेवारी रोजी बिबवेवाडीतील दवाखान्यात डाॅक्टर तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी डाॅक्टर सावंतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला. बिबवेवाडी पोलिसंकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो नवी मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस कर्मचारी नीलेश खोमणे, सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले,  प्रवीण पाटील यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader