पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा अखेऱ आज दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास सापडला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे.

पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..
Youth muder in wadi
नागपूर : गांजा पिण्यावरून वाडीत युवकाचा भोसकून खून

स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावरून अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन केलं होतं. ”तुम्ही पाहिजे तेवढे पैसे घ्या पण माझ्या लेकराला सोडा.”, अशी आर्त विनवणी ते करत होते. तसेच, त्याला ताप आला असल्यास कुठलं औषध द्यायचं हे देखील त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. हे सगळं पाहून नेटिझन्स व नागरिकही हळहळत होते.

दरम्यान, पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि  त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. तत्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले होते.  

या प्रकरणाच्या संपूर्ण मूळाशी पुणे पोलीस १०० टक्के जातील; तपास अंतिम टप्प्यात –

“ ११ जानेवारी रोजी बाणेर-बालेवाडी येथील डॉक्टर चव्हाण दाम्पत्य यांचा चार वर्षीय मुलगा स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू याचं अपहरण झालं होतं. त्याचा तपास सुरू असताना आज या मुलास अपहरणकर्त्याने एका ठिकाणी एका व्यक्तीकडे सुपूर्द केलं होतं. त्यावर या मुलास पोलिसांनी ताब्यात घेऊन, सुखरूपणे त्याच्या पालकांकडे सोपवलं. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणात माध्यमांनी अतिशय संयम बाळगून आम्हाला सहकार्य केलं. पुणे पोलिसांचा तपास युद्ध पातळीवर सुरू होता आणि सुरू राहील. या प्रकरणाच्या संपूर्ण मुळाशी पुणे पोलीस १०० टक्के जातील. त्या मुलाच्या पालकांनी देखील चांगलं सहकार्य केलेलं आहे. आमच्याकडे योग्य ते धागेदोरे आहेत आणि मुलगा सुखरूप सापडल्यानंतर आता तपास अधिक वेगाने होऊन, यामधील सर्व सत्य पुणे पोलीस बाहेर काढतील. आम्ही तपासाच्या अतिशय अंतिम टप्प्यात आहोत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रकरणाचं संपूर्ण सत्य पोलीस माध्यमांसमोर मांडतील. फक्त सर्वांनी हे मूल सापडलं म्हणून सुटकेचा निःश्वास सोडावा. ” अशी माहिती पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माध्यमांनी दिली आहे.