पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या चोरीला; भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरी | Table chairs stolen from office of National Green Tribunal pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या चोरीला; भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरी

राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या (एनजीटी) कार्यालयातून चोरट्यांनी खुर्च्या, टेबल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

national green tribunal
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या (एनजीटी) कार्यालयातून चोरट्यांनी खुर्च्या, टेबल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत ‘एनजीटी’चे कार्यालयीन अधिकारी विजय सिंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विधान भवन परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत ‘एनजीटी’चे कार्यालय आहे. कार्यालयातील भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक टेबल आणि चार खुर्च्या लांबविल्या.

टेबल, खुर्च्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.‘एनजीटी’च्या कार्यालयात चोरी करणारा माहितगार असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:30 IST
Next Story
पुणे: टोमॅटो, काकडी, फ्लाॅवरचे भाव झाले स्वस्त; अंबाडी, पालकाचे दर कडाडले