“फुकट ‘बिर्याणी’ मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा”

पतित पावन संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निषेध आंदोलन

फुकट बिर्याणी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारवाई करा… स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत आज पुण्यामध्ये पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. तर याविषयी चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

पुणे पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; आयुक्तांना दिला आदेश

पुणे पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला बिर्याणीची ऑर्डर देत असून फुकटात आणण्यास सांगत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

पुणे पोलीस अन् बिर्याणी : “ त्या ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे; हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे”

तर, “ ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे. चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतरच जे सत्य आहे ते समोर येईल. गृहमंत्र्यांनी याबाबत जे काही सांगितलं आहे, त्यावरून सर्व काही स्पष्ट होईल. हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे.” असं म्हणत पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सध्या पुणे पोलीस दलाबाबत चर्चेचा विषय ठरत असलेल्या बिर्याणी प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Take action against police officers who demand free biryani patit pawan sanghatana msr 87 svk

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी