‘पाहू द्या रे मज विठोबाचे रूप’ असे म्हणत आळंदी आणि देहू येथून पायी अंतर पार करत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची टाळ आणि पखवाज दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षानंतर हाताला काम मिळाले असून वाद्य कारागिरांना आता पालखी आगमनाची प्रतीक्षा आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी हरिनामाचा गजर करीत पायी जाणारी वारी हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.

करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे पालखी सोहळा होऊ शकला नाही. करोना रुग्ण कमी झाल्याने यंदा शासनाने दक्षता घेऊन परवानगी दिली असल्याने पंढरपूर वारीसाठी वारकरी आतूर झाले आहेत. टाळ- पखवाज आणि एकतारी वीणा दुरुस्त करून घेण्यासाठी शुक्रवार पेठेतील दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. योग्य दुरुस्त झालेल्या पखवाजचा नाद सर्वांना पालखी सोहळा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याची साक्ष देत आहे.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम

पालखी सोहळ्यानिमित्त पखवाज दुरुस्त करून घेण्यासाठी वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षांनंतर वारीमध्ये सहभागी होता येणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असून आम्हालाही पखवाज दुरुस्त करण्याचे काम मिळाले आहे, असे चर्मवाद्य दुरुस्ती करणारे विजय नाईक यांनी सांगितले.

नाईक म्हणाले, सध्या ग्रामीण भागातील भजनी मंडळाचे तसेच वारकऱ्यांचे असे दररोज किमान दहा पखवाज दुरुस्तीसाठी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कातड्याची पुडी बदलणे, पुडीवरील काळ्या रंगाची शाई बदलणे, पखवाज ज्याने जोडला जातो त्या पांढऱ्या रंगाचा पट्ट्या म्हणजे वादी बदलणे आणि ज्या कातड्यावर शाई नसते त्या डाव्या बाजूचे ‘धूम’चे कातडे बदलणे अशी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, पालखी आगमन झाल्यापासून पुण्यातून मार्गस्थ होईपर्यंत यामध्ये प्रचंड वाढ होते. पालखीचे वेध लागल्यापासून ते पालखी पुण्यातून पुढे मार्गक्रमण करेपर्यंतच्या कालखंडात किमान पाचशे पाखवाजांची दुरुस्ती केली जाते. त्यातून एक लाख रुपयांची उलाढाल होते. मणी आणि पट्टी बदलून टाळ दुरुस्त केले जातात.

गावातील भजन- कीर्तन यामध्ये वापर केला जाणारा पखवाज हा प्रामुख्याने आंबा, लिंब आणि शिसम या झाडाच्या लाकडापासून केला जातो. हे पखवाज चार ते पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, पालखीबरोबर चालत जाताना गळ्यामध्ये अडकवून वादन करणे सोयीचे व्हावे तसेच वजनाला हलके असावे या दृष्टीने स्टीलचा वापर करून बनविलेल्या पाखवजचा उपयोग केला जातो. या पखावजची किंमत चार ते साडेचार हजार रुपये आहे. काशाचे टाळ एक हजार रुपये जोडी या दरामध्ये उपलब्ध आहेत, असे नाईक यांनी सांगितले.