scorecardresearch

Premium

Talathi Bharti Exam: उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा

राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

talathi bharti exam
तलाठी भरती ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पुणे : राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे.

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

Talathi exam candidates check answer sheet tomorrow pune
तलाठी परीक्षेच्या उमेदवारांसाठी उद्यापासून उत्तरतालिका पाहण्याची सुविधा
five decision of shinde fadnavis government taken back in one and a quarter years
मंत्रालयात १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नेण्यावर बंदी
Mahavitaran Recruitment 2023
१० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजच करा अर्ज
rahul narvekar eknath shinde uddhav thackrey
आमदार अपात्रता सुनावणी तीन आठवडे लांबणीवर; तात्काळ निर्णय देण्याची ठाकरे गटाची मागणी

दरम्यान, ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम असणार असून, त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित  जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Talathi bharti exam candidates can check answer sheet online from tomorrow ysh

First published on: 27-09-2023 at 00:24 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×