Talathi death drowning in lake accident dawn pune print news ysh 95 | Loksatta

तलावात बुडून तलाठ्याचा मृत्यू; भोरमधील पाझर तलावातील दुर्घटना

पाझर तलावात बुडून तलाठी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

तलावात बुडून तलाठ्याचा मृत्यू; भोरमधील पाझर तलावातील दुर्घटना
(प्रातिनिधिक फोटो)

पुणे : पाझर तलावात बुडून तलाठी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावात ही घटना घडली. मुकुंद त्रिबंकराव चिरके (वय ३५, सध्या रा. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे, मूळ रा. जहागीरमोहा, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. मुकुंद चिरके मित्रांबरोबर दररोज सकाळी फिरायला जायचे. सोमवारी सकाळी मुकुंद आणि त्यांचे तीन मित्र नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी सातच्या सुमारास वरवे खुर्द गावातील लघुपाटबंधारे विभागाच्या पाझर तलावात ते पोहण्यासाठी उतरले. त्या वेळी पोहताना त्यांची दमछाक झाली आणि ते पाण्यात बुडाले. काठावर थांबलेल्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. ग्रामस्थांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. भोईजल पथकाने शोधमोहीम राबवून दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलाधिकारी सचिन कंडपेल्ली, विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी आदींनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-07-2022 at 21:13 IST
Next Story
पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडीत; जनसंवाद सभेत शहरवासियांच्या तक्रारींचा ओघ