लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राज्यातील दहावीच्या निकालातून सुमारे आठ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षणाची दिशा आणि समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने यंदापासून घेतला आहे.
राज्यात दरवर्षी साधारपणे १८ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. परीक्षेचा निकाल साधारपणे सरासरीने ९२ टक्केच्या जवळपास असतो. त्यामुळे सुमारे ८ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहचण्यास त्यांना अडसर निर्माण होत आहे. विविध शासकीय, अशासकीय संस्थांनी कौशल्यावर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षण, समुपदेशासाठी शिबीर आयोजित करण्यासाठीचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.
हेही वाचा… पुणे : श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग
प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी माध्यमिक स्तरावरील दहावीच्या निकालाचे जिल्ह्यातील सर्व शाळांच्या निकालाचे विश्लेषण करून संख्यात्मक दृष्टिकोनातून सर्वाधिक विद्यार्थी किमान अध्ययन क्षमता पातळी प्राप्त करू न शकणान्या शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी तयार करणे, संबंधित शाळांमधील अध्ययन अडसर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील दिशा, व्यवसाय कौशल्य विकास किंवा अन्य अनुषांगिक उद्बोधनाकरीता शिबिरांचे आयोजन करावे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एका उद्बोधन सत्राचे आयोजन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.