scorecardresearch

कर निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा २०१९ या अंतर्गत राज्य कर निरीक्षक या संवर्गाचा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

SSC HSC board exam

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा २०१९ या अंतर्गत राज्य कर निरीक्षक या संवर्गाचा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात अनिकेत पाटील आणि आशा घुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा २०१९ जुलै आणि ऑगस्ट २०१९मध्ये घेतली होती. त्यातील कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शासन सेवेतील सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास आरक्षण रद्दबातल ठरवले. त्यानंतर राज्य शासनाने ठरवलेल्या कार्यपद्धतीनुसार एमपीएससीने सुधारित निकाल जाहीर केला.

सुधारित अंतिम निकालानुसार नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जातील पात्रतेच्या पुष्टय़र्थ त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्यात येईल. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास, दावे तपासताना आणि अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. समांतर आरक्षण आणि अन्य मुद्दय़ांसदंर्भात विविध न्यायालय, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tax inspector exam results mpsc supreme court amy

ताज्या बातम्या