पुणे : गुण वाढवून देतो सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; तोंडाला काळं फासून काढली शिक्षकाची धिंड!

गुण वाढवून देतो असं सांगून बारावीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाची पुण्यात पालकांनी तोंडाला काळं फासून धिंड काढली आहे.

teacher asks for sexual relationship to 12th class girl student in pune case registered (2)
मार्क वाढवून देतो सांगत शिक्षकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी

करोना काळात बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून गुण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली. मात्र, याचाच गैरफायदा पुण्यातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकानं घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परीक्षेत गुण वाढवून देतो, असं सांगून एका शिक्षकानं बारावीच्या एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थिनीच्या पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आज या विकृत शिक्षकाची तोंडाला काळं फासून धिंड काढली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पवार असे या शिक्षकाचे नाव आहे.

नेमकं झालं काय?

पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो, असं सांगून अभिजित पवार हा सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र, नकार देऊन देखील प्रकार सुरूच राहिल्यामुळे अखेर सदर विद्यार्थिनीने शिक्षक अभिजित पवारने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला आणि आपल्या पालकांना, तसेच नातेवाईकांना ऐकवला.

महाविद्यालयात घुसून शिक्षकाला फासलं काळं

हा प्रकार लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आणि इतर नातेवाईक तसेच परिचितांनी शिक्षकाला जाब विचारण्यासाठी थेट महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी विद्यार्थिनी देखील सोबत होती. यावेळी अभिजित पवारला सगळ्यांनी रंगेहाथ पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. तसेच, त्याच्या तोंडाला शाई फासून त्याची महाविद्यालयातून थेट विश्रामबाग पोलीस स्थानकापर्यंत धिंड काढण्यात आली.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्थानका मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून शिक्षकाचा रेकॉर्ड केलेला फोन कॉल देखील त्यांनी पोलिसांना ऐकवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Teacher asks for sexual relationship to 12th class girl student in pune case registered pmw

ताज्या बातम्या