रोड रोमिओला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आधी हा व्हिडिओ शहरातील फुलेनगर भागातील असल्याचे सांगितले जात होते. हा व्हिडिओ फुलेनगर येथील नसल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
छेड काढल्यामुळे रोड रोमिओला निर्वस्त्र करून एक महिला सॅंडलने बेदम चोप देत आहे. इतर नागरिक देखील त्याला जाब विचारत महिलेची माफी मागायला लावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिलेची मारहाण होताच इतर जमलेल्या नागरिकांनी देखील रोड रोमिओला लाथांनी मारहाण केली. हा सर्व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील फुलेनगर भागातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा व्हिडिओ तिथला नसल्याचे समोर आलेले आहे. अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जमादार यांनी दिली आहे.
रोड रोमिओला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. pic.twitter.com/rUyI8EA7ZA
— LoksattaLive (@LoksattaLive) September 17, 2024
हेही वाचा – बोईसर: विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली; रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली
हेही वाचा – शहरबात : पंतप्रधानांचा लाभदायी दौरा
महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाल्याचा विरोधकांनी आरोप केलेला आहे. तशा घटना देखील समोर आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिक देखील अशा घटना घडल्यानंतर कायदा हातात घेऊन संबंधित रोड रोमिओला चोप देताना दिसत आहेत. या घटनेत देखील रोड रोमिओला नागरिक चोप देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे? हे समोर आलेलं नाही. याची सत्यता पोलीस पडताळत आहेत.