पिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार; आरोपीस अटक | Loksatta

पिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार; आरोपीस अटक

यासंदर्भात चोवीस वर्षीय पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार; आरोपीस अटक
(प्रातिनिधिक छायाचित्र )

पुणे – विवाह झाल्याचे लपवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पिस्तुलाच्या धाकाने तिच्यावर बलात्कार केल्याप्रक रणी एकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली.  सचिन शिवाजी धिवार (वय ४०, रा. वडगाव शेरी) असे त्याचे नाव आहे. यासंदर्भात चोवीस वर्षीय पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी धिवार याचा विवाह झाला होता.त्याला दोन मुलगे आहेत.  पहिला विवाह झाल्याचे त्याने लपवले. तरुणीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्याने तरुणीेसोबत विवाह केला. दरम्यान, धिवार हा विवाहित असल्याची माहिती तिला समजली. त्यानंतर त्याने तिला धमकावून त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडले. पिस्तुलाच्या धाकाने तिच्यावर बलात्कार केला. माझ्यासोबत असलेली छायाचित्रे लोकांना दाखवेन, अशी धमकी त्याने दिली. पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.  न्यायालयाने धिवार याच्या पोलीस कोठडीत पंधरा मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड.अनंत घरत यांनी बाजू मांडली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-05-2017 at 03:04 IST
Next Story
माहिती तंत्रज्ञानात भारत महासत्ता आहे हा भ्रम-अच्युत गोडबोले