देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, तुकोबांच्या मूर्तीच लोकार्पण होणार आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने उद्या सकाळी ८ ते १४ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी डीजी रजनीश सेठ यांनी पोलीस पथकासह देहूतील शिळा मंदिर, मुख्य मंदिर परिसराला सुरक्षेच्या कारणास्तव भेट दिली होती. त्याठिकाणची पाहणी करण्यात आली. देहूतील शिळा मंदिर, मूर्तीचा लोकार्पण होताच देहूपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, वारकरी, नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती