पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस), नॉन क्रिमिलेअर (एनसीएल) आणि सीव्हीसी किंवा टीव्हीसी (जात-जमाती वैधता प्रमाणपत्र) प्रमाणपत्रासाठीची पावती सादर केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप मूळ प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नसल्यास तात्पुरता प्रवेश देण्याची सूचना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) महाविद्यालयांना दिली आहे. मात्र केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी संपण्यापूर्वी मूळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून दिलेल्या मुदतीत मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंदर्भात सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर ई पडताळणी केंद्रावर कागदपत्रांची छाननी करून उमेदवारांना प्रवेश निश्चित करता येईल. मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध न झालेले उमेदवार शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास त्यांना पावतीच्या आधारे तात्पुरता प्रवेश द्यावा. उमेदवाराने पावती दिल्याची नोंद अंतिम गुणवत्ता यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. पावतीच्या आधारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची मूळ प्रमाणपत्रे दुसरी फेरी संपण्यापूर्वी सादर न केल्यास त्या उमेदवारांचा तात्पुरता प्रवेश प्रणालीतूनच आपोआप रद्द होणार असल्याबाबत उमेदवारांना माहिती द्यावी, असे नमूद केले आहे.

Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने
Gujarat High Court refuses to take cognizance of attack on foreign students
आम्हाला तपास संस्था करू नका! परदेशी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची स्वत:हून दखल घेण्यास गुजरात उच्च न्यायालयाचा नकार

ईडब्ल्यूएस, एनसीएल, सीव्हीसी किंवा टीव्हीसी प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतीत सादर न केल्याने प्रवेश रद्द झालेले उमेदवार खुल्या गटातून प्रवेशासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास ते केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया संपल्यावर रिक्त जागांसाठी आणि संस्था स्तरावरील जागांसाठी पात्र राहतील, असेही स्पष्ट केले आहे.