scorecardresearch

पुणे : डॉक्टर्स डे निमित्त दहा करोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान 

करोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर देवदूतच आहेत.

Doctors day
करोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान ( प्रतिनिधिक छायाचित्र )

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी करोना काळात देवदूताची भूमिका बजावणाऱ्या कोथरूड परिसरातील दहा डॉक्टरांचा शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

कोथरूड परिसरातील डॉ. सुहास नेने, डॉ. सुरेश बोरकर, डॉ. अशोक सोहोनी, डॉ. मिताली कुलकर्णी, डॉ. समीर नारकर, डॉ. विजय तरटे, डॉ. स्वाती सुराणा, डॉ. एस. एम. भाटे, डॉ. बी. एम. गदादे, डॉ. मीना पाटील या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप होते.

करोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर देवदूतच आहेत. त्यांच्या कौशल्याने आणि ज्ञानाने अनेकांना जीवनदान मिळाले. करोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला, असे कोथरूड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले. ऋषीकेश कडू, सुनील हरळे, ऋषिकेश शिंदे, तेजस बनकर, पृथ्वी दहीवाळ या वेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ten corona warrior doctors honored on the occasion of doctor day pune print news amy