पुणे : खेळताना विजेचा धक्क्याने दहा वर्षांच्या शाळकरी मुलाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वडगाव शेरीतील गणेशनगर भागात घडली. शाळकरी मुलाचा वीजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.

मोहित वेदकुमार चावरा (वय १०, गल्ली क्रमांक ९, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मित्रांसोबत घराजवळ खेळत होता. त्यावेळी अचानक त्याचा हात अर्थिंगच्या वायरला लागला. वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने वीजेचा धक्का मोहितला बसला. मोहित जागेवर कोसळळा. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Arrested for acid attack on wife and son out of anger over divorce Mumbai
घटस्फोट दिल्याच्या रागातून पत्नी व मुलावर ॲसिड हल्ला; दोघेही गंभीर जखमी, आरोपीला अटक
gondia, boy died, drowning, mine,
गोंदिया : मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात आंघोळ करणे जिवावर बेतले; मुलाचा बुडाल्याने मृत्यू
bhaindar uttan marathi news
भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Girl dies after being hit by a Citylink bus in nashik
सिटीलिंक बसच्या धडकेने बालिकेचा मृत्यू, आजोबा जखमी
Shiv Sena deputy leades son hit a couple with a car Mumbai
धनिकपुत्राची दांडगाई! शिवसेना उपनेत्याच्या मुलाची मोटारीने दाम्पत्याला धडक, दोन किलोमीटरपर्यंत फरफटल्याने महिलेचा मृत्यू
Seven cow and Buffaloes died due to lightning in Pisvali near Dombivli
डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू
Chandrapur, Mother, poisoned,
चंद्रपूर : आधी पोटच्या गोळ्याला विष पाजले, मग स्वतः घेतला गळफास; त्या मातेने का उचलले टोकाचे पाऊल?
Death of an infant due to open DP of Mahavitran in vasai
महावितरणाच्या उघड्या डीपी मुळे चिमुकल्याचा मृत्यू

हेही वाचा…पिंपरी-चिंचवड: शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅव्हल्स ला भीषण आग; सुदैवाने जीविहितहानी नाही

मोहितचे वडील व्यावसायिक आहेत. तो एका शाळेत चौथीत होता. चावरा कुटुंबीय मूळचे गुजरातचे असून, व्यवसायाच्यानिमित्ताने ते वडगाव शेरी भागात काही वर्षांपूर्वी स्थायिक झाले. अपघातानंतर महावितरणमधील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा…पुणे : चांदणी चौक परिसरात अपघात; मालवाहू एसटी बसची सिमेंट मिक्सरला धडक

विजेच्या धक्क्याने तिसरा मृत्यू

गेल्या काही दिवसात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची तिसरी घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी हडपसर भागात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. आठवड्यापूर्वी बालेवाडी भागात उघड्यावर पडलेल्या वायरमधून विजेचा धक्का बसल्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वडगाव शेरी भागात शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.