पुढील आठवड्यात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’; तीन दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम

मुंबई : इतके  दिवस प्रतीक्षेत असलेला दहावीचा निकाल आता लागला आहे. आता प्रश्न आहे, दहावीनंतर पुढे काय?… करिअरची निवड हा कायमच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो, पण यंदा करोनाच्या परिणामांमुळे तो आणखी जटिल झाला आहे.

भविष्यात करिअरच्या कोणत्या वाटा प्रकाशमान असतील, कोणत्या झाकोळल्या जातील, कुठे कितपत वाव असेल, अशा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या ऑनलाइन करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उत्तरे मिळणार आहेत. २१, २२ आणि २३ जुलै रोजी हा मोफत ऑनलाइन कार्यक्रम होणार आहे.

या वेळी विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधील करिअर संधी, या शाखांमधून शोधता येणाऱ्या वेगळ्या शिक्षणवाटा, नव्याने उदयास आलेल्या संधी, परदेशातील शिक्षणाची सद्य:स्थिती, या सगळ्यांविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकांचे निरसनही करतील.

सहभागी होण्यासाठी…

http://tiny.cc/LS_MargYashacha

या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ज्या सत्रांमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्याप्रमाणे नोंदणी करा.

’नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल.

’याद्वारे २१ जुलैपासून वर नमूद केलेल्या वेळेत या वेब-संवादात सहभागी होता येईल.

’अधिक माहितीसाठी  ँ३३स्र://६६६. ’ङ्म‘२ं३३ं.ूङ्मे या संकेतस्थळाला भेट द्या.

तज्ज्ञांचा सल्ला…

२१ जुलैला ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत कला शाखेतील संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत, तर २२ जुलैला बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (स्वायत्त महाविद्यालय) माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ वाणिज्य शाखेतील करिअर संधींविषयी माहिती देणार आहेत. विज्ञान शाखेतील संधींविषयी २३ जुलै रोजी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर संवाद साधणार आहेत.