पुणे : वैमनस्यातून टोळक्याने गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत कोयते उगारून दहशत माजविली. दोन जणांवर कोयत्याने वार करून टोळक्याने परिरसरातील वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी दहाजणांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अजय डिकळे, रोहित जाधव, यश मान, रमेश उर्फ राजा मेंडम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सचिन माने, बालाजी उमाप, विजय डिकळे, पल्या पालांगे, आयुष माने, निखील माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश तुळशीराम पवार (वय २८, रा. वैदुवाडी, हडपसर) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी आकाश पवार ओळखीचे आहेत. पवारचा भाऊ प्रकाश, सोहेल शेख यांनी एकाचा खून केला होता. वडिलांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पवार आणि शेख कारागृहातून सुट्टी घेऊन बाहेर आले होते. प्रकाश पवार आणि त्याचे मित्र मीनाताई ठाकरे वसाहतीत गेले होते. त्यावेळी आरोपी माने, उमाप, डिकळे, पालंगे, माने, जाधव, मेंडम तेथे आले. त्यांच्याकडे कोयते, पालघन अशी शस्त्रे होती.

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

हेही वाचा – ‘बौद्धिक संपदे’त भारत अजूनही मागेच, ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’चा अहवाल; अमेरिका पहिला, तर चीन २४ वा

हेही वाचा – राज्यातून साडेनऊ लाख टन कांदा निर्यात, उन्हाळी कांद्याच्या निर्यातीच्या नियोजनाची गरज

आरोपींनी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. प्रकाश पवार आणि त्याचा मित्र सूरज मोहम्मद सिद्दीकी, लल्लू रतन सरोदे यांच्यावर कोयत्याने वार केले. परिसरात कोयते, पालघन उगारून दहशत माजविली, तसेच वाहनांची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तपास करत आहेत.