scorecardresearch

येरवड्यात कोयता गँगची दहशत; गुंडांकडून वाहनांची तोडफोड

गुंडांनी रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात घडली.

Terror of Koyta Gang Yerawada
येरवड्यात कोयता गँगची दहशत; गुंडांकडून वाहनांची तोडफोड (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात कारागृहातून जामिन मिळवून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने कोयते उगारून दहशत माजविली. गुंडांनी रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात घडली.

हेही वाचा – पुणे : छतावर लटकणाऱ्या वीजवाहिनीच्या धक्क्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू; बोपोडीतील घटना, घरमालकाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात उड्डाणपूल, पीपीपीवरील रस्ते उभारणीला प्राधान्य

या प्रकरणी सुलतान रिझवान शेख (वय २१, रा.कोंढवा), साजिद शेख (वय १८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलतान शेख सराईत गुन्हेगार असून घरफोडीच्या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. पाडव्याच्या दिवशी शेखची जामिनावर सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर शेख आणि साथीदारांनी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात दहशत माजविली. लक्ष्मीनगर भागात कोयते उगारले. रस्त्यावर पडलेले दगड वाहनांवर फेकून तोडफोड केली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 22:56 IST

संबंधित बातम्या