scorecardresearch

‘३ हजार देतो तुम्ही एकदा…’ म्हणत महिलेचा विनयभंग; आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मी तीन हजार रुपये देतो असं म्हणत त्याने पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच, त्यांच्या साडीचा पदर ओढल्याचे तक्रारीत म्हणलं आहे.

‘३ हजार देतो तुम्ही एकदा…’ म्हणत महिलेचा विनयभंग; आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
( प्रातिनिधिक छायाचित्र )

पिंपरी- चिंचवडमधील भोसरी येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तीन हजार रुपये देतो असे म्हणून अश्लील शब्द वापरून महिलेच्या साडीचा पदर ओढून विनयभंग केला आहे. याप्रकरणी आरोपी संजय मानेला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गंभीर घटनेबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

हेही वाचा- पुणे: चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या पादचारी तरुणावर चाकूने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४५ वर्षीय महिलेची मुलगी आरोपीच्या मुलाची मैत्रीण आहे. मुलगी घरी न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी त्या मुलीच्या मित्राच्या घरी गेल्या. तिथं आरोपी संजय माने याने तक्रारदार महिलेचा विनयभंग केला. मी तीन हजार रुपये देतो असं म्हणत त्याने पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच, त्यांच्या साडीचा पदर ओढल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या ४५ वर्षीय महिलेने भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी संजय मानेला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 17:36 IST

संबंधित बातम्या