scorecardresearch

पिंपरी पोलिसांचा दरारा! तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवडमध्ये तीन ठिकाणी काही तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची घटना काल (मंगळवार)घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंपरी पोलिसांचा दरारा! तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गोळीबार करणारे आरोपी

पिंपरी- चिंचवडमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी हवेत गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले होते. मात्र, अवघ्या काही तांसातच आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील पोलिस अतिसक्षम आहेत. त्यांचा नेहमीच दरारा राहील असे उद्गार काढत आयुक्त अंकुश शिंदेंनी तपास आधिकाऱ्यांची पाठ थोपटली. शहरातील गुन्हेगारी गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता कमीच आहे असेही ते म्हणाले. 

हेही वाचा- पुणे: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना १५ दिवसांत निघेल; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

शाहरुख शहानवाज शेख, फारुख शहानवाज शेख, शोएब शेख आणि शोएब अलवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. त्यांना गुंडा विरोधी पथक, दरोडा विरोधी पथकाने गजाआड केलं. किरकोळ कारणावरून आरोपींनी हवेत गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दोन पिस्तूलातून हवेत चार गोळ्या झाडल्याच पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 

हेही वाचा- १३ डिसेंबरला पुणे बंद; राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांचा निर्णय

सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात चार जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन पत्राशेड येथील दुकानदाराला दमदाटी आणि मारहाण करून सीसीटीव्ही कॅमेरा बंद करायला लावला. तेथील लोकांना दमदाटी करत भर वस्तीत पिस्तूलातून हवेत गोळ्या झाडल्या. पुढे शंभर मीटरवर म्हणजे भाट नगर आणि बौद्ध नगर येथे देखील जाऊन दोन पिस्तूलातून पुन्हा हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीती होती. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले, स्वतः पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भेट देऊन तात्काळ आरोपींना शोधण्याचे आदेश दिले. अवघ्या चार तासातच आरोपीला गुंडा विरोधी पथक आणि दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 

हेही वाचा- भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवा ,‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना

याबाबत आज पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. तिथं आयुक्त अंकुश शिंदेंनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. गुन्हेगारी वाढली आहे का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देत, गेल्या तीन वर्षातील गुन्हेगारी ची आकडेवारी पाहता गुन्हेगारी वाढली नसल्याच त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी- चिंचवड शहरातील अतिसक्षम अशी पोलिस यंत्रणा आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांचा दरारा नेहमीच वाढलेला असेल. अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:22 IST

संबंधित बातम्या