पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक आहेत. निवडणूक लढविण्यासाठी दहा अर्ज आले आहेत. त्या अर्जांची चाचपणी सुरू असून, तीन फेब्रुवारीपर्यत उमेदवाराचे नाव निश्चित आणि जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी येथे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदर मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका भाजप विरोधकांनी  घेतली आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘धर्मवीर’, आणखी ‘या’ सात मराठी चित्रपटांचा समावेश

काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंदे शिंदे आणि सहयोगी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यात चुरस आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचाच होता. कसबा मतदार संघ काँग्रेस पुन्हा मिळविणार आहे. पोट निवडणुकीसाठी दहा अर्ज आले आहेत. त्याची चाचपणी सुरू आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The congress candidate for kasba announced in first week february nana patole statement pune print news apk 13 ysh
First published on: 23-01-2023 at 18:38 IST