मी काँग्रेस पक्षाचा ४० वर्षापासून कार्यकर्ता आहे. आजपर्यंत पक्षाकडे काहीही न मागता काम करीत राहिलो. पण कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन कसबा विधानसभा पोटनिवडणुक निवडणुक लढण्याची इच्छा पक्षश्रेष्ठी कडे व्यक्त केली. मात्र उमेदवारी काही दिली नाही. त्यामुळे आज मी उमेदवारी अर्ज दाखल करीत असून मला दुःख वाटत की, पक्षाने माझ्या कामाची दखल घेतली नाही, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी मांडली. आजवर काँग्रेस पक्षाने अन्याय केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडणुकीत मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा- एक आठवी पास, तर दुसरा १२ वी पास कोट्याधीश, कसब्यातील भाजपा-काँग्रेस उमेदवारांची संपत्ती किती? वाचा…
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज भाजपाकडून हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज केसरीवाडा येथून काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर हे असंख्य कार्यकर्त्यांसह रॅली काढत.गणेश कला क्रिडा रंगमंच येथे अर्ज दाखल करणार आहेत.