महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अद्याप या प्रकरणातील न्यायालयीन आदेशाची अधिकृत प्रत पोलिसांना उपलब्ध झाली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- पुणे : स्वारगेट भागात प्रवाशांना लुटणारी चोरट्यांची टोळी गजाआड

Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
Sanjay Singh accused of making offensive remarks about Prime Minister Modi educational qualifications
संजय सिंह यांची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याबाबत पोलिसांनी सादर केलेला अहवाल बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांनी फेटाळून लावला. मात्र, काही मुद्द्यांवर तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. या आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर पुढील तपास नेमका कोणत्या मुद्द्यांवर करायचा, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध हो्ईल तसेच तपासाची दिशाही निश्चित करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे ‘सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी’चे मोफत प्रशिक्षण

काँग्रेसचे नेते नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ठपका ठेवण्यात आला होता. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.