scorecardresearch

पुणे: गुन्हे शाखेतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना पकडले

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी  दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तीस हजार रुपयाची लाच घेताना,  एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहात पकडले. 

पुणे: गुन्हे शाखेतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना पकडले
पुणे: गुन्हे शाखेतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना पकडले

पुणे: मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी  दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तीस हजार रुपयाची लाच घेताना,  एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.  मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा >>> पुणे: हाॅटेलमध्ये हाणामारी; १३ जणांच्या विरोधात गुन्हा; वारजे भागातील घटना

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दीपक प्रल्हाद क्षीरसागर आणि सिमोन अविनाश साळवी अशी दोघांची नावे आहेत. तक्रारदाराच्या भावाला  मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस कर्मचारी क्षीरसागर याने लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार नोंदविण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.  त्यानुसार पथकाने सापळा लावून  सिमोन साळवी यांच्यामार्फत तीस हजार रुपयाची लाच घेताना पकडले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 11:37 IST

संबंधित बातम्या