Premium

पुण्यातील प्रसिद्ध ‘पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल पाकिटावर

गेल्या नऊ दशकांपासून पुणेकरांना अस्सल मराठमोळे भोजन देण्यामध्ये अविरतपणे कार्यरत आणि उतारवयातील कलाकारांची आपुलकीने सेवा देणारे आश्रयस्थान असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ’पूना गेस्ट हाऊस’ला आता टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान मिळाला आहे.

The famous Puna Guest House in Pune is now on the postal envelope pune print news
पुण्यातील प्रसिद्ध 'पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल पाकिटावर

पुणे : गेल्या नऊ दशकांपासून पुणेकरांना अस्सल मराठमोळे भोजन देण्यामध्ये अविरतपणे कार्यरत आणि उतारवयातील कलाकारांची आपुलकीने सेवा देणारे आश्रयस्थान असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ’पूना गेस्ट हाऊस’ला आता टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान मिळाला आहे. असा बहुमान प्रथमच आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाला आहे.टपाल विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आलेल्या पुणेपेक्स प्रदर्शनामध्ये पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण  गुरुवारी करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, अभय सरपोतदार, साधना सरपोतदार आणि शर्मिला सरपोतदार उपस्थित होत्या. मूकपटाचे निर्माते नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ मध्ये स्थापन केलेल्या पूना गेस्ट हाऊसच्या माध्यमातून सरपोतदार कुटुंबाची चौथी पिढी कार्यरत आहे.टपाल विभागाच्या उपक्रमाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक करून किशोर सरपोतदार म्हणाले, इंटरनॅशल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटीचे बहुमोल सहकार्य या कामी लाभले आहे. पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र टपाल पाकिटावर प्रसिद्ध केल्यामुळे आमची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच जगाच्या पाठीवर होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The famous puna guest house in pune is now on the postal envelope pune print news vvk 10 amy

First published on: 08-12-2023 at 04:43 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा