scorecardresearch

Premium

पुणे : जेवणात चिकन न दिल्याने वडिलांनी मुलीच्या डोक्यात मारली वीट

पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने वडिलांनी मुलीच्या डोक्यात वीट मारुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना पाषाण परिसरात घडली.

father hit the girl on the head
पुणे : जेवणात चिकन न दिल्याने वडिलांनी मुलीच्या डोक्यात मारली वीट (image – pixabay/representational image)

पुणे : पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने वडिलांनी मुलीच्या डोक्यात वीट मारुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

two person murder senior
वरिष्ठाने ‘बॉसगिरी’ करून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली, चिडलेल्या दोघांनी…
loksatta satire article on ashok chavan name in adarsh scam join bjp
उलटा चष्मा : अपघातानंतरचा ‘आ’!
akola crime news, father killed his son akola marathi news
धक्कादायक! दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले; बनाव रचला, पण पोलीस तपासात…
man stole 111 bikes for household expenses after love marriage
नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर आर्थिक अडचणी वाढल्या; खर्च भागवण्यासाठी प्रेमविराने तब्बल १११ दुचाकी चोरल्या

हेही वाचा – ‘स्मार्ट सिटी’चा स्मार्ट कारभार? पुण्यातील हवेच्या गुणवत्तेची माहिती हवीय? मग पैसे द्या!

विकास नागनाथ राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत रघुनाथ लालू पवार यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड आणि पवार नातेवाईक आहेत. २७ नोव्हेंबर रोजी विकास रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आला. पत्नीने त्याला जेवणाचे ताट दिले. पत्नीने चिकन न केल्याने विकास चिडला. त्याने घरात असलेली वीट मुलीच्या डोक्यात मारली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विकास पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The father hit the girl on the head with a brick because the wife did not give chicken for dinner this incident took place in pashan area pune print news rbk 25 ssb

First published on: 01-12-2023 at 15:46 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×