पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांसाठी हजारो कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता शनिवारी (१७ ऑगस्ट) वितरित केला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून सध्या आमदार स्थानिक निधी, जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) आणि दुर्गम भागातील पायाभूत सुविधा यांसाठी खाली पैसे पाठविण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केल्यानंतरच हा निधी टप्प्याटप्प्याने स्थानिक पातळीवर वितरीत होणार असल्याचे मंत्रालयातून सांगण्यात येत आहे.

आमदारांना स्थानिक विकास निधीची रक्कम वाढवून ती पाच कोटी रुपये करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी प्राप्त निधीपैकी ५० टक्के खर्च झालेल्या आणि प्रशासकीय मान्यता ८० टक्के असलेल्या मतदारसंघांमध्येच वाढीव एक कोटीचा निधी वितरित करण्याचा निकष ठरविण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीतून विधानमंडळाच्या प्रत्येक सदस्याला मूळ चार कोटी रुपये आणि हा निधी वेळेत खर्च करणाऱ्या आमदारांना आणखी एक कोटी रुपये वाढीव निधी देण्यात येतो. त्यानुसार आमदारांना वर्षाला पाच कोटी रुपये निधी निश्चित करण्यात आला आहे. चालू वर्षात हा निधी ३.२० कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तो अद्याप प्राप्त झालेला नाही. निवडणूक तोंडावर असल्याने आमदारांना निधीची प्रतीक्षा आहे. याशिवाय पुणे जिल्हा नियोजन समितीचा देखील केवळ ३० टक्के निधीच प्राप्त झाला आहे.

opposition to bail of Agarwal couple accused in Kalyaninagar accident case Pune
अगरवाल दाम्पत्याला जामीन दिल्यास परदेशात पसार होण्याची शक्यता; कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामिनास विरोध
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव
Supreme Court News
Ladki bahin yojana : “..तर ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचे आदेश देऊ”, महाराष्ट्र सरकारवर ‘सर्वोच्च’ ताशेरे
Jejuri Fort Pilgrimage Development Plan Mutual Approval of Bypass PWD Pratap
जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा : बायपासला परस्पर मान्यता ‘पीडब्ल्यूडी’चा प्रताप
sunita williams and barry wilmore
Sunita Williams : अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? NASA चं धक्कादायक उत्तर
Nepal Bus Accident
Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेत जळगावमधील २४ जणांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह उद्या महाराष्ट्रात आणले जाणार

हेही वाचा >>>भाजप आमदार राम शिंदे यांचा गुंड निलेश घायवळ यांच्यावर वरदहस्त : आमदार रोहित पवार

दरम्यान, राज्यातील दुर्गम भागात पायाभूत सुविधांसाठी २८ जिल्ह्यांसाठी २५५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लाडकी बहीणसह विविध योजनांसाठी निधी राखून ठेवण्यात आल्याने राज्यातील दुर्गम भागांसाठी केवळ नऊ कोटी रुपये (दहा टक्के) निधी वितरीत करून गेल्या आर्थिक वर्षातील सुरू झालेली कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाने इतर विकासकामांचा निधी रोखून धरला आहे. या योजनेचा पहिला हप्ता वितरीत केल्यानंतरच इतर विकासकामांसाठी प्राधान्यक्रम ठरवून निधी देण्याचे मंत्रालयातून स्थानिक अधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे.