scorecardresearch

पुणे:‘कसब्या’तील रणनीती ठरविण्यासाठी भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेची उद्या पहिली संयुक्त बैठक

कसबा विधनसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची शुक्रवारी बैठक होणार आहे.

bjp
‘कसब्या’तील रणनीती ठरविण्यासाठी भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेची उद्या पहिली संयुक्त बैठक

कसबा विधनसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची शुक्रवारी बैठक होणार आहे. पोटनिवडणुकीची तयारी आणि रणनीतीसंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

हेही वाचा >>>Kasba Chinchwad by-election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीमध्ये आता ‘आप’ची एन्ट्री

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून, निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवासांपूर्वी निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने बैठकही घेतली होती.

हेही वाचा >>>‘कसब्या’ची पोटनिवडणूक ‘राष्ट्रवादी’ने लढविण्यासाठी अजित पवारही सकारात्मक, निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत?

राज्यातील सत्तांतरानंतर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना आगामी निवडणुका युती म्हणून लढणार आहे. कसब्यात बाळासाहेबांची शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीची तयारी आणि रणतीनी यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे, असे बाळासाहेबांची शिवसेनेचे युवा सेना सचिव किरण साळी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 18:20 IST
ताज्या बातम्या