युतीचं भवितव्य माहिती नाही पण, शिवसेनेचे किमान १५० आमदार असतील : आदित्य ठाकरे

पुण्यातील आंबेगाव खुर्द-जांभुळवाडी येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते, यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.

यंदाचे वर्ष हे शिवसेनेचे वर्ष असणार असून युती होईल किंवा नाही हे सांगू शकत नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे किमान १५० ते १७५ आमदार असतील, असा विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मतदान जिथे करायच असेल तिथे करा, पण आमच्या मागे तुमचे आशिर्वाद कायम असू द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.

पुण्यातील आंबेगाव खुर्द-जांभुळवाडी येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते, यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार आणि जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, आमदार नीलम गोऱ्हे, भाजपाचे आमदार भीमराव तापकीर, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, शिवसेना नेते महादेव बाबर, नगरसेविका संगीता ठोसर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The future of the alliance is not known but shiv sena will have at least 150 mlas says aditya thakre

ताज्या बातम्या