पुणे : मोटारचालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – ‘चंद्रकांत’ विधानावर अजित पवार यांची माफी, म्हणाले..
हेही वाचा – “मी पुन्हा आलो, निम्मे पिंपरी-चिंचवडकर झोपले असताना..”; अजित पवार यांची फटकेबाजी
अमोल लोंढे (वय २०, रा. संकेत विहार, हडपसर) असे गुहा दाखल केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. याबाबत पीएमपी चालक तुषार डोंबाळे (वय ३५, रा. सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर भागातील संकेत विहार सोसायटीसमोर मोटारचालक लोंढेने अचानक मोटार बससमोर थांबविली. बस मागे घे, असे सांगून लोंढेने पीएमपी चालक डोंबाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोंढे पीएमपी बसमध्ये शिरला. त्याने पीएमपी चालक डोंबाळे यांना मारहाण केली. डोंबाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुशील डमरे तपास करत आहेत.