scorecardresearch

पिंपरी : अतिक्रमण कारवाईतील जप्त मालाचा गोलमाल, कनिष्ठ अभियंता निलंबित

अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या पाच उद्वाहक (लिफ्ट) मशिन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले.

junior engineer suspended
पिंपरी : अतिक्रमण कारवाईतील जप्त मालाचा गोलमाल, कनिष्ठ अभियंता निलंबित (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या पाच उद्वाहक (लिफ्ट) मशिन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.

संतोष शिरसाठ असे निलंबित केलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. शिरसाठ हे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अतिक्रमण पथकप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. चिखली, मोशीतील अनधिकृत कच्ची, पक्की घरे, पत्राशेड, हातगाड्या, टपऱ्या, पथारीवाले, फळविक्रेत्यांवरील कारवाईसाठी त्यांची नेमणूक होती. शिरसाठ यांनी भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर बऱ्याच वर्षांपासून बेवारसपणे लावलेल्या आणि बंद अवस्थेत असलेल्या पाच लिफ्ट मशिनवर २५ मार्च २०२३ रोजी अतिक्रमण कारवाई केली.

samosa seller woman molested kalyan
कल्याणमध्ये समोसा विक्रेत्या महिलेचा विनयभंग
showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
bombay high court sentences developer
अवमान केल्याप्रकरणी विकासकाला तीन महिन्यांचा कारावास; हमीपत्राचे पालन न करणे भोवले
bhandara murder, bhandara criminal naim shaikh murder case, infamous criminal naim shaikh murdered by his enemy
कुख्यात नईमच्या खुनाचा उलगडा; वर्षांपूर्वी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला

हेही वाचा – “हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर काय बिघडलं?”, पुण्यात धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी…”

हेही वाचा – कसबा पेठेतील वातावरण पुन्हा तापले

हस्तगत केलेल्या मशिन मोशीतील वाहनतळाच्या ठिकाणी जमा करणे आवश्यक असताना जवळपास पाच महिने विलंबाने म्हणजे २७ ऑगस्ट रोजी तक्रारीनंतर अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथे जमा केल्या. शिरसाठ यांनी कारवाई करताना नियमित सूचनांचे पालन केले नाही. मशिन जाणीवपूर्वक ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात ठेवल्या. याबाबत त्यांनी केलेला खुलासा सयुक्तिक नाही. त्यांच्या गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. ते प्रत्यक्ष सेवेत राहिल्यास तपासात अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. पुराव्यात फेरफार होऊ नये यासाठी शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The junior engineer was suspended for dereliction of duty pune print news ggy 03 ssb

First published on: 21-11-2023 at 11:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×