scorecardresearch

पुणे: कुणाल टिळक यांना सायबर चोरट्यांचा दूरध्वनी; पोटनिवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

election
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू असताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्याच्या आमिष दाखविणारा दूरध्वनी सायबर चोरट्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबाबत टिळक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

हेही वाचा >>>“ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता”, कसबा पेठ पोटनिवडणुकीवर शैलेश टिळक यांचे विधान

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश, चिरंजीव कुणाल यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. कुणाल यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधून उमेदवारी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. सायबर चोरट्याने पक्षातील प्रमुख नेत्यांची नावे सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. कुणाल यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:31 IST