scorecardresearch

पुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने दहा लॉजिस्टिक पार्क आणि नऊ ड्रायपोर्ट सुरू करण्यात येत आहेत .

पुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका
अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे. तर ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. ही न्यायालयाची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे उदय सामंत म्हणाले.

वेदांता प्रकल्प बाहेर गेला याची खंत आम्हाला आहे. विरोधकांकडून टीका होत असताना गेले आठ महिने हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यास इच्छुक असताना महविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

हेही वाचा >>> “अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला…”; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंवर निशाणा!

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने दहा लॉजिस्टिक पार्क आणि नऊ ड्रायपोर्ट सुरू करण्यात येत आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही त्यांनी सांगितले.दि़ पूना मर्चंटस चेंबरच्या वतीने व्यापारमहर्षी उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृर्तीनिमित्त आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी़ सामंत बोलत होते़.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या