उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत दाट धुके आणि तीव्र थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे या भागाकडून महाराष्ट्राकडे थंड वारे वाहू लागले आहेत. परिणामी शुक्रवारपेक्षा शनिवारी राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागात कडाक्याची थंडी पडली असून या ठिकाणी किमान तापमानाचा पारा १०.३ अंशांपर्यंत घसरला आहे. राज्याच्या इतर ठिकाणीही किमान तापमानाचा पारा घसरला असून नाताळ राज्यात गुलांबी थंडी घेऊन आला आहे.

हेही वाचा- पुणे विद्यापीठाची सत्र परीक्षा २७ डिसेंबरपासून; आता छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकन सुविधा उपलब्ध

Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?
Heat stroke, Maharashtra
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतात शीतलहर मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. परिणामी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्कीम ओरिसा, आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी तसेच दाट धुके पसरले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर या भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके राहणार आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही थंडी वाढू लागली आहे.

हेही वाचा- पुण्यात कोव्हिशिल्डचा तुटवडा; खासगी रुग्णालयेही खरेदीबाबत साशंक

बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा आता श्रीलंकेकडे सरकला आहे. त्यामुळे या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी आता उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे हळूहळू वाहू लागले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी राज्यातील नाशिक भागाचे किमान तापमान कमी होऊन थंडीची तीव्रता वाढली आहे. पुणे आणि परिसरात देखील रात्रीच्या थंडीत वाढ होऊन किमान तापमान ११.६ अंशावर आले आहे, तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा- पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती

राज्याचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

शहर कमाल किमान
पुणे ३२.४ ११.६

कोल्हापूर ३०.९ १७.४
महाबळेश्वर २७.० १५.५

नाशिक ३०.५ १०.३
सांगली ३२.० १५.२

सातारा ३२.७ १४.०
मुंबई २९.० १८.८

रत्नागिरी ३१.५ १९.१
डहाणू २६.८ १७.५

बुलढाणा २९.२ १६.४
ब्रह्मपुरी ३३.९ १४.१

यवतमाळ ३१.५ १४.५