पुणे: पुणे आणि मुंबईला जोडण्याचे काम डेक्कन क्वीन एक्स्प्रेस गेली ९३ वर्षे करीत आहेत. या गाडीसोबत प्रवाशांचे वर्षानुवर्षे खास ऋणानुबंध जुळले आहेत. यामुळे प्रवाशांनी आपल्या या लाडक्या राणीचा वाढदिवस गुरूवारी जल्लोषात पुणे रेल्वे स्थानकावर साजरा केला.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्थानकावर रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. डेक्कन क्वीनचे इंजिनही फुलांनी सजवण्यात आले होते. बँड वाजवत गाडीचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पाटील यांनी गाडीची पाहणी केली आणि प्रवाशांशी संवाद साधला. याचबरोबर गाडीच्या चालकांना फेटा बांधण्यात आला. या वेळी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

ltt thivim 3 hour late marathi news
मुंबई: प्रवाशांच्या गोंधळानंतर अखेर रेल्वेगाडी सुटली, एलटीटी-थिवी रेल्वेगाडी तब्बल तीन तास उशिरा
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका
Over 3500 monthly passes for air-conditioned locales on a single day
गारेगार प्रवासाला पसंती! वातानुकूलित लोकलचे एकाच दिवशी ३,५०० हून अधिक मासिक पास

१ जून १९३० रोजी सुरूवात

महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ ची १ जून १९३० रोजी सुरुवात हा मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स गाडी होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते, त्याला ‘दख्खनची राणी’ असेही म्हटले जाते.