पुणे: नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द | The petition regarding the metro line in River Panvel was canceled by NGT pune print news amy 95 | Loksatta

पुणे: नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द

वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गिकेसाठी उभारण्यात आलेल्या खांबामुळे मुठा नदीला अडथळा निर्माण होत आहेत.

पुणे: नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द
नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द

वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गिकेसाठी उभारण्यात आलेल्या खांबामुळे मुठा नदीला अडथळा निर्माण होत आहेत. मार्गिकेचे खांब निळ्या पूररेषेत उभारण्यात आले आहेत, अशी पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) रद्दबातल केली आहे.

हेही वाचा >>>पुणे: व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या पाचजणांना अटक; आंतराष्ट्रीय बाजार पेठेत पाच कोटींची किंमत

माजी खासदार अनू आगा, पर्यावरणप्रेमी आरती किर्लोस्कर, सारंग यादवाडकर यांच्यासह अन्य काही जणांनी यासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात एनजीटीने ऑक्टोबर २०१७ मध्ये नदीपात्रातील मेट्रोच्या बांधकामांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितने जानेवारी २०१८ मध्ये त्यांचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर नदीपात्रातील कामांना एनजीटीने मान्यात दिली होती. अखेर ही याचिका एनजीटीकडून रद्दबातल करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>राज्यातील १९ लाख विद्यार्थी अद्यापही आधार कार्ड विना

या प्रकरणात महापालिकेच्या वतीने ॲड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली. पर्यावरणाला बाधा पोहचू नये, याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. मेट्रो सार्वजनिक प्रकल्प आहे. मेट्रो मार्गिकेच्या खांबांचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे, असे एनजीटीकडून याचिका रद्द करताना सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:35 IST
Next Story
पुणे: सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित