महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी आज(शनिवार) पुण्यात मुलाखत घेतली. यावेळी विविध मुद्य्यावरून या नेत्यांना प्रश्न विचारले गेले, ज्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच ईडी, आयकर विभागाच्या धाडी पडतात, भाजपाच्या नेत्यांवर पडत नाहीत. तुम्ही सत्तेत राहून प्रशासकीय कामकाज देखील पाहीलेलं आहे, अशा पद्धतीने खुलेआम विविध यंत्रणा वापरणं हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

शरद पवार म्हणाले, “हे अजिबात योग्य नाही. परंतु सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी असं केलं, तर त्यांच्या विचाराशी संघर्ष करणारा जो घटक आहे तो तातडीने शरणागती पत्कारेल. पण तुम्हाला आठवत असेल, विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर मला नोटीस आली होती, त्यानंतर मी आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, की सकाळी आपल्याला ईडी कार्यालयात जायचं आणि ईडीच्या कार्यालयात येतो म्हणून फोन केला तर, धावून धावून ईडीचे अधिकारी यायला लागले आणि हात जोडून की येऊ नका, येऊ नका असं म्हणू लागले. त्यामुळे अशी संकटं आल्यानंतर आपलं नाणं खणखणीत असल्याने असल्या दडपशाहीला घाबरायचं नाही. या सगळ्या प्रवृत्तींना धाडसाने तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. या लोकांनी कधी आयुष्यात संघर्षाला खऱ्या अर्थाने तोंड दिलेलं नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखीच इतर लोक असतील परंतु तीच त्यांची फसगत आहे.”

तसेच, “जाणीवपूर्वक नव्या पिढीमध्ये धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात. माझं स्वच्छ मत आहे, की त्यांना यश येणार नाही. लोक ऐकतील दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील.” असं यावेळी शरद पवारांनी एका प्रश्नाला उत्तर देताना बोलून दाखवलं.
याचबरोबर, “काश्मीर फाईल्स हा चित्रपट संबंध देशामधील लोकांवर काही वेगळा परिणाम करावा, या वृत्तीने तयार केला गेलेला आणि खोटी स्थिती मांडलेला आहे. यामध्ये जे दाखवलय की पंडितांची हत्या तिथे होते आणि जो काळ होता त्या काळात देशात भाजपाच्या मदतीचं सरकार होतं. आज त्या ठिकाणी जे घडतय त्या ठिकाणी ते घडत असताना आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे. हे सरकार असताना पंडितांना संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे ते अपयशी ठरले. काहीतरी चुकीचा विचार मांडून, प्रचार करून लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जाणून घेतलं पाहिजे.” असंही यावेळी शरद पवारांनी बोलून दाखवलं.