कोथरूडमधील लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत पावणे दहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बाबुराव पवार ( वय ५४, रा. कोथरूड ) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष पवार यांच्यासह संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख, व्यवस्थापक रंजना दीपक निकम, नियंत्रक अभिजीत भोसले, वैशाली पवार यांच्यासह अकरा संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले

याबाबत विशेष लेखा परीक्षक जे. एस. गायकवाड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत पतसंस्थेत जमा झालेल्या नऊ कोटी ७४ लाख ४० हजार १६९ रुपयांचा अपहार पतसंस्थेचे अध्यक्ष पवार तसेच संचालकांनी केल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले. पतसंस्थेतील नियंत्रकांशी संगमनत करुन अध्यक्ष आणि संचालकांनी अपहार केल्याचे आढळून आले. ही रक्कम त्यांनी बनावट कर्जदारांच्या नावे वर्ग केल्याचे तपासणीत उघडकीस आले. याबाबत आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेत तक्रार देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करत आहेत.

हेही वाचा >>>पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

सहा हजार ३०२ ठेवीदारांची फसवणूक
लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्विकारण्यात आल्या होत्या. ठेवींची मुदत संपल्यानंतर सहा हजार ३०२ ठेवीदारांना ठेवी परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The president of lakshmibai nagari credit union arrested in connection with embezzlement in the credit institution in kothrud pune print news amy
First published on: 29-11-2022 at 22:39 IST