scorecardresearch

अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’

संकेतस्थळावर ताण आल्याने संकेतस्थळ उघडण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही.

result aptitude test teacher recruitment
अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’ (संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. मात्र संकेतस्थळ हँग झाल्याने अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही.

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवरील भरतीची प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारास अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत पात्र ठरणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली. राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यानंतर उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा होती.

हेही वाचा – भाजपाच्या ‘संकल्पा’ला अंदाजपत्रकाची ‘सिद्धी’?

हेही वाचा – पुणे : जुन्या योजनांना नव्याने मुलामा; समान पाणीपुरवठा, नदीसुधार योजना, जायका प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

काही दिवसांपूर्वी परीक्षा परिषदेने २४ मार्चच्या सुमारास निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर https://www.mscepune.in/ या संकेतस्थळाद्वारे शुक्रवारी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र संकेतस्थळावर ताण आल्याने संकेतस्थळ उघडण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 00:23 IST

संबंधित बातम्या