scorecardresearch

पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी करण्यात आली.

पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी करण्यात आली. त्यात प्राचार्य फोरमचे डॉ. नितीन घोरपडे, डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ. राजेंद्र भांबर, डॉ. प्रदीप दिघे, डॉ. संपत काळे विजयी झाले.विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठाच्या अधिसभेत प्राचार्य गटाच्या एकूण दहा जागा आहेत. त्यातील खुला प्रवर्ग वगळता आरक्षित प्रवर्गातील पाच जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या. तर एस.टी प्रवर्गाची जागा रिक्त राहिली आहे. एससी प्रवर्गातून डॉ. देविदास वायदंडे, ओबीसी प्रवर्गातून डॉ. वैभव दीक्षित, एनटी प्रवर्गातून डॉ. गजानन खराटे, तर महिला प्रवर्गातून डॉ. क्रांती देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. तर खुल्या प्रवर्गातील उर्वरित पाच जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीतील पाच जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले

डॉ. नितीन घोरपडे सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयाचे, डॉ. राजेंद्र झुंजारराव शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे, डॉ. राजेंद्र भांबर नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे, डॉ. प्रदीप दिघे प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे, डॉ. संपत काळे ओझर येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. निवडून आलेल्या सदस्यांची मुदत ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत किंवा विद्यापीठ कायद्यातील कलम ६३ आणि ६४मधील तरतूद किंवा शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून या पैकी जे आधी घडेल त्या तारखेला संपुष्टात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 21:32 IST

संबंधित बातम्या