scorecardresearch

Premium

राज्य सरकार केवळ तोंड वाजविणारे, सरकारी धोरणांवर राज ठाकरे यांची टीका

दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्यासाठी शिंदे सरकार कारवाई का करत नाही, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली.

Raj Thackeray criticizes state government
राज्य सरकार केवळ तोंड वाजविणारे, सरकारी धोरणांवर राज ठाकरे यांची टीका (संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्य सरकार अनेक मुद्द्यांवर केवळ तोंड वाजवित आहे. बाळासाहेबांचे विचार घेतल्याचे सांगायचे आणि मराठी भाषेसंदर्भात काहीच करायचे नाही, अशी सरकारची कृती आहे. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्यासाठी शिंदे सरकार कारवाई का करत नाही, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली. पाषाण येथील मनसे कार्यकर्त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याची कार्यवाही होत नसल्यामुळे मनसेकडून खळखट्याक भूमिका घेण्यात आली आहे. मनसेकडून मुंबई, ठाणे शहरातील दुकानांची इंग्रजीतील नावे हटविण्यात आली आहेत. यासंदर्भात राज यांच्याकडे विचारणा केली असता सरकारची यासंदर्भात बोटचेपी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

Jarange Patil accused the government of conspiracy against the movement
आंदोलनाविरुद्ध सरकारचे षड्यंत्र, जरांगे यांचा आरोप; रविवारी समाजबांधवांची बैठक
manoj jarange patil and chhagan bhujbal
‘दादागिरीला थांबवणार की नाही’, मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले, “छत्रपती…”
Abhishek Ghosalkar live
VIDEO : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
rohini khadse asha volunteers protest slams maharashtra government
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार महिलांविरोधी

हेही वाचा – पुणे : ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यानंतर आता कारागृह रक्षकही गजाआड

सरकार अनेक मुद्द्यांवर केवळ तोंड वाजवित आहे. बाळासाहेबांचे विचार घेतल्याचे सांगायचे आणि मराठी भाषेसाठी काहीच करायचे नाही, असे सरकारचे धोरण आहे. मशिदीवरील भोंगेही सरकारला काढता आले नाहीत. काही झाले की बाळासाहेबांचे विचार-बाळासाहेबांचे विचार करायचे आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणायचे नाहीत. सर्वोच्च न्यायालायाने आदेश देऊनही कार्यवाही होत नसेल तर सरकारचा धाक राहिला नाही, असे दिसते, असे राज यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : नगर रस्त्यावर वायूगळती प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यातील वाढती गुंडगिरी, अमली पदार्थांची विक्री संदर्भात पोलिसांना चोवीस तासांची मोकळीक दिली तर ते असले सर्व प्रकार मोडीत काढतील. अमली पदार्थ तस्करीमागे कोण आहे, त्यासाठी पैसा कोठून येतो, याचा शोध घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The state government is speaking raj thackeray criticizes state government policies in pune pune print news apk 13 ssb

First published on: 28-11-2023 at 19:57 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×