प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालकाचे अपहरण करून चोरट्यांनी मोटार चोरल्याची घटना पुणे-नगर रस्त्यावर घडली. धावत्या मोटारीतून चालकाला फेकून चोरटे मोटार घेऊन पसार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत संतोष नाना पवार (वय ३६, रा. भिंगार एसटी थांब्याजवळ, अहमदनगर ) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष पवार प्रवासी वाहतूक करतो. प्रवाशांना पुण्यात सोडून तो पहाटे मोटारीतून नगरकडे जात होता. नगर रस्त्यावरील चंदननगर भागातील थांब्यावर तो थांबला होता. नगरकडे जाणारे प्रवासी मिळाल्यास तो त्यांना घेऊन जाणार होता. त्या वेळी तीन चोरटे तेथे आले. ‘आमच्या भावाचा लातूरला मृत्यू झाला आहे. आम्हाला लातूरला सोडतोस का?’, अशी विचारणा चोरट्यांनी केली. मात्र संतोष पवारने त्यांना सोडण्यास नकार दिला. त्यानंतर चोरट्यांनी रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पवारच्या डोक्यात घातला आणि त्याला धमकावून मोटारीत बसण्यास सांगितले. पवारच्या खिशातील तीन हजार रुपये देखील त्यांनी काढून घेतले. पुढे काही अंतर गेल्यानंतर त्याला धावत्या मोटारीतून रस्त्यावर फेकून चोरटे मोटार घेऊन पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The thieves stole the car by throwing the driver on the road from the speeding car incidents on city streets pune print news msr
First published on: 23-04-2022 at 16:56 IST